कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’
कोकणच्या सौंदर्याला ‘कातळशिल्पाचे गोंदण’ By ऑनलाइन लोकमत on Sun, June 17, 2018 1:57pm मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. Open in App - मेहरून नाकाडे रत्नागिरी : ऐतिहासिक काळातील सांंस्कृतिक संंदर्भ म्हणून कातळशिल्पांंचे विशेष महत्त्व आहे. आदिमानवाने विविध शिल्पे दगडात कोरून ठेवलेली आहेत. मात्र, ती कशाची चित्रे आहेत, त्यातून काय व्यक्त होते हे सांगणे अवघड आहे. मुख्यत्वे लेण्यांच्या भिंतींवर केलेले कोरीव काम सर्वत्र आढळते. परंतु, संपूर्णपणे उघड्यावर असलेल्या कातळावरील ही खोदचित्रे महाराष्ट्रात विशेष करून कोकणातच आढळली आहेत. सर्वाधिक कातळशिल्पे ही रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात शिल्परचना सापडल्या आहेत. विविध प्राणी, पक्षी, सुंदर नक्षीकाम असलेली ही खोदचित्रे गूढ आहेत. जगभरात अशा प्रकारच्या शिल्प किंवा चित्रांना ‘रॉक आर्ट किंवा पेट्रोग्लिफ्स किंवा कातळशिल्प’ या नावाने ओळखले जाते.