उक्षी येथील हत्तीच्या कातळशिल्पाचे लोकार्पण
e-Paper , बुधवार, ऑगस्ट 19, 2020 उक्षी येथील हत्तीच्या कातळशिल्पाचे लोकार्पण रविवार, 21 जानेवारी 2018 रत्नागिरी - तालुक्यातील उक्षी येथील 16 बाय 18 फुटी हत्तीचे कातळ खोदशिल्प रविवारपासून लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोकणात प्रथमच या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे. रत्नागिरी - तालुक्यातील उक्षी येथील 16 बाय 18 फुटी हत्तीचे कातळ खोदशिल्प रविवारपासून लोकांना पाहण्यासाठी खुले झाले. ग्रामपंचायत व लोकसहभागातून कोकणात प्रथमच या खोदशिल्पाचे संरक्षण केले आहे. रत्नागिरी, राजापूर, लांजा या तीन तालुक्यांतील 43 गावांत 71 ठिकाणी 950 खोदशिल्प आढळली आहेत. सुमारे दहा हजार ते 35 हजार वर्षांपूर्वीची ही शिल्पे म्हणजे जागतिक वारसा आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने शासनाच्या वतीने पुढाकार घेतला जाणार आहे. दृष्टीक्षेपात... उक्षी गाव जगाच्या नकाशावर मुंबई-गोवा महामार्गापासून 25 किमीवर कातळशिल्पासूान दोन किमीवर धबधबा गेल्या तीन वर्षांपासून कातळशिल्पांवर मोठे संशोधन सुरू आहे. सरपंच मिलिंद खानविलकर व उपसरपंच हरिश्चंद...