चालुक्यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला
चालुक्यकालीन शिलालेख सांगलीतील भाळवणीत सापडला Apr 5, 2019 By सकाळवृत्तसेवा एक नजर भाळवणी (ता. खानापूर) येथे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार शेतकऱ्यांकडून बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व व्यापाऱ्यांकडून दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात मिरज - सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकणारा सुमारे ९५० वर्षांपूर्वीचा शिलालेख भाळवणी (ता. खानापूर) येथे सापडला आहे. चालुक्य राजा सोमेश्वर (दुसरा) ऊर्फ भुवनैकमल्ल याच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैन बस्तीचा जीर्णोद्धार गावातील तत्कालीन शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला. तसेच बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर, मानसिंगराव कुमठेकर यांनी शिलालेख शोधला. जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेणी, त्यांची कामगिरी, जैन धर्मीयांचे स्थान यांची माहिती नव्याने प्रकाशात आली. हळेकन्नड लिपीतील हा जिल्ह्यातील सर्वांत जुना शिलालेख असल्याचा संशोधका